आनंद कसंबे यांची पत्रकारिता लोकोपयोगी – आशीष जाधव
अनुबाेध' लघूपट फेस्टीवलला यवतमाळकरांचा उदंड प्रतिसाद

यवतमाळकॉटन सिटी न्यूज
व्यवस्था बदलण्याच्या प्रक्रियेत समाज आजही पत्रकारांकडे आशेने बघतो. पत्रकार आपल्या लेखणीतून आणि वृत्त छायाचित्रकार आपल्या कॅमेरातून बदल घडवू शकतो, हा विश्वास समाजाला आहे. यवतमाळचे वृत्त छायाचित्रकार आणि लेखक, दिग्दर्शक, माहिती व लघुपट निर्माते आनंद कसंबे यांनी लोकोपयोगी पत्रकारिता कशी असावी, हे त्यांच्या कार्यातून दाखवून दिले आहे, असे कौतुकोद्गार लाेकमत व्हिडीओचे संपादक आशीष जाधव यांनी काढले.
स्थानिक महेश भवनमध्ये रविवारी आनंद कसंबे यांच्या ‘अनुबोध’ लघूपट फेस्टिवलचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी जाधव प्रमुख वक्ता म्हणून बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी सुरेश राठी हाेते. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री सुभाष शर्मा, किशाेर दर्डा, निर्माता, दिग्दर्शकआनंद कसंबे, प्रा. घनश्याम दरणे आदी उपस्थित हाेते.
पुढे बोलताना आशीष जाधव म्हणाले, पाटी काेरी असणारा माणूस तळमळीने तांत्रिक शिक्षण घेताे आणि ताेच माेठा हाेताे. पत्रकारितेत स्टाेरी टेलींग महत्वाचे आहे. पत्रकाराला अंतर्मन असायला हवे. समाजाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी पत्रकारांची आहे. पत्रकारांनी लाेकाेपयाेगी पत्रकारिता करावी, असे आवाहनही जाधव यांनी केले. शेतकऱ्यांचे जीवनमान बदलण्यासाठी शाश्वत उपाययाेजना करण्यात आल्या नाही. परिणामी आताही शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी सेंद्रीय शेती प्रयाेगासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल सुभाष शर्मा, यवतमाळ जिल्ह्यातील साकूर येथील संपादक आशीष जाधव व लघूपट व माहितीपटासाठी आनंद कसंबे व निता कसंबे यांचा यवतमाळकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. आनंद कसंबे निर्मित, दिग्दर्शन केलेले अनेक माहिती व लघूपट यावेळी दाखविण्यात आले. प्रास्ताविक प्रा. घनश्याम दरणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रलय टिप्रमवार यांनी केले. आभार प्रशांत बनगीनवार यांनी मानले. कार्यक्रमाला तहसीलदार डाॅ. याेगेश देशमुख, डाॅ. प्रकाश नंदूरकर, अनंत काैलगिकर, शेषराव डाेंगरे, संदीप शिंदे, दीपक बागडी, डाॅ. आलाेक गुप्ता, प्रवीण तिखे, डाॅ. सुरेंद्र पद्मावार आदींसह सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते.