महावीर पाणपोईचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आज दिनांक 8 एप्रिल रोजी पोस्ट ऑफिस चौक यवतमाळ येथे महावीर युवक मंडळ जोश फाउंडेशन यवतमाळ सकल जैन समाज यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर पाणपोई चे उद्घाटन लोकप्रिय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लोकमत समूहाचे प्रमुख किशोरबाबू दर्डा. जैन सेवा समितीचे अध्यक्ष महावीर भन्साली लोकमत सखी मंचच्या जिल्हाध्यक्षा सौ सीमा किशोर दर्डा बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट संजय जैन जैन महिला समितीचे अध्यक्ष सौ चंदा कोटेचा आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना लोकप्रिय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी महावीर पानपोई चा उपयोग ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिक व न्यायालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांकरता होणार असून महावीर पाणपोई चा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असे आव्हान करून उपस्थित नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या शुभेच्छा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी प्रदान केल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी अंशुल तातेड.तिलकराज गुगलीया यानी प्रयत्न केले प्रसंगी महावीर युवक मंडल, जोश फाउंडेशन चे समस्त सदस्य, सकल जैन समाज व पदाधिकारी उपस्थित होते