ताज्या घडामोडी

प्रतिनिधी विकास अन् सुरक्षेला प्राधान्य देणाराच असावा डाॅ. विजय दर्डा :

मांगुळकर यांच्या समर्थनात सकल जैन समाजाची सहविचार सभा

 

 

 

यवतमाळ : भाईचारा, सभ्यतेवर माझा विश्वास आहे, हिंसेवर नाही. आपले घर, गाव असाे अथवा शहर प्रत्येकाला शांतता हवी असते. यवतमाळात आणलेले उद्याेग बंद पडले. काहींनी उद्याेग येऊच दिले नाही. बेराेजगारांच्या हाताला काम नाही. उपाशी माणसाच्या हातात चाकू येताे. त्यातूनच भीतीचे वातावरण निर्माण हाेते. आपल्या मतदारसंघाचा प्रतिनिधी हा विकास करणारा आणि सुरक्षेला प्राधान्य देणाराच असावा. शहराचा चेहरा बदलण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांना एक संधी द्या, असे आवाहन राज्यसभेचे माजी सदस्य डाॅ. विजय दर्डा यांनी केले.माजी आमदार कीर्ती गांधी यांच्या निवासस्थानी सकल जैन समाजाची सहविचार सभा पार पडली. यावेळी ते बाेलत हाेते.अध्यक्षस्थानी सकल जैन समाजाचे ज्येष्ठ श्रावक ॲड. अमरचंद दर्डा हाेते. प्रमुख मार्गदर्शक सकल जैन समाजाचे अध्यक्ष तथा माजी खासदार डाॅ. विजय दर्डा हाेते. यावेळी माजी आमदार कीर्ती गांधी, ‘लोकमत’चे जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, महावीर दिगंबर जैन मंदिर महावीरनगरचे विनोद महाजन, दिगंबर जैन मंदिर संस्थान माळीपुराचे अध्यक्ष अशोक रोहणे, भारतीय जैन संघटनेचे महेंद्र सुराणा, श्वेतांबर मूर्ती पूजक श्री संघाचे अध्यक्ष सुभाष जैन, उपाध्यक्ष उमेश कोठारी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष उद्योजक नंदकुमार सुराणा, गुजराती समाजाचे अध्यक्ष व जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष चेतन पारेख, उद्योजक भरतभाई शहा, भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विजय कोटेचा, प्रकाश काेटेचा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती हाेती.पुढे बाेलताना डाॅ. विजय दर्डा म्हणाले, टक्केवारीने विकासकामांची वाट लागली आहे. निकृष्ट असल्यानेच अमृत पाणीपुरवठा याेजनेचे पाइप फुटत आहे. १९६२ मध्ये पाण्यासाठी रांगा लागत हाेत्या. आजही आठ-आठ दिवस नळाला पाणी येत नाही. लहान मुले नशेच्या आहारी गेली आहेत. अमली पदार्थाची खुलेआम विक्री केली जाते. यवतमाळच्या विकासाचा आलेख चढला नाही तर उलट खालीच आला आहे. कामे आणायची आणि टक्केवारी विकायची, हेच सध्या सुरू आहे. आपल्या डाेळ्यांवर पट्टी बांधली असल्याने काहीही दिसत नाही. काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार कायम उपलब्ध राहणारा आणि कधीही, कुणाला सहज उपलब्ध हाेणारा आहे. शहराचा चेहरामाेहरा बदलण्यासाठी मांगुळकर यांना सर्वांनी एक संधी दिली पाहिजे, असे कळकळीचे आवाहन डाॅ. विजय दर्डा यांनी केले.

माजी आमदार कीर्ती गांधी म्हणाले, जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्याकडे विकासाचा दृष्टिकाेन हाेता. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळसारख्या ग्रामीण भागात आणले. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन डाॅक्टर झाले. उद्याेगमंत्री असताना रेमंड, ओरिएंट सिंटेक्स उद्याेग आणले.४० किलाेमीटर अंतरावरून गाेखी प्रकल्पाचे पाणी एमआयडीसीत आणले. अनेक वर्षांनंतरही पाइपलाइन कुठेही लिकेज हाेत नाही. मात्र, ३६० काेटी रुपयांचा खर्च हाेऊनही ‘अमृत’चे पाइप फुटत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.प्रकाश चाेपडा यांनी प्रास्ताविक केले. महावीर युथ फाउंडेशनचे अध्यक्ष विजयकुमार बुंदेला यांनी सूत्रसंचालन व आभार केले. सभेला गुजराती जैन समाज बांधव, ओसवाल जैन समाज, कच्ची गुजराती जैन समाज, दिगंबर जैन समाज, कालार जैन समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!