ताज्या घडामोडी

ठेवीदारांना ठेवीदारांच्या ठेवी परत करा किंवा जिवंत मरण्याची परवानगी शासनाने द्यावी.. ठेवीदारांची मागणी 

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली तर्फे विदर्भ अध्यक्ष श्री देवराव राठोड आणि महाराष्ट्र उपसचिव सौ.सरला इंगळे श्री देवसिंग राठोड विदर्भ सचिव यांच्या उपस्थितीत दिनांक २०/०१/२०२५ रोजी पासून १) प्रणित मोरे व इतर अटक झालेल्या संचालक मंडळाची चल वचन मालमत्ता जप्त करून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात याव्या. २) जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस येथे शासकीय प्रशासक यांची नियुक्ती करण्यात यावी. ३) जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस अंतर्गत येत असलेल्या सर्व शाखेचे शाखा प्रबंधक व्यवस्थापक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणी करिता उपोषणास श्री मधुकरराव मडावी बसले होते. यांची प्रकृती दिनांक 21/ ०1/ 2025 रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालय येथे भरती करण्यात आले असून त्यांचे जागेवर दिलीप महादेवराव इंगळे हे आमरण उपोषण करत आहे आमरण उपोषण आझाद मैदान यवतमाळ येथे सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ येथील ठेवीदाराने पाठिंबा दर्शविला असून त्यामध्ये मुकुंदराव दारुंडे प्रकाश हिंगलासपुरे दिगंबर मेसेवार श्रीमती रेखाताई बुटले श्री राहुल दाहुलकर सौ मंगला ढोकळे नी पाठींबा दिला आहॆ दिनांक 21 जानेवारी 2025 रोजी सन्माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी सुद्धा भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देण्याबाबत कळविले आहे या मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीचे देवरावजी राठोड दिलीप इंगळे देवसिंग राठोड हे पदाधिकारी व यांच्यासोबत इतर पदाधिकारी उपोषण मंडपात हजर आहे दरम्यान ठेवीदारांनी आमची गुंतवणूक परत करा अन्यथा जिवंत मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी रेटली आहे.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!