ताज्या घडामोडी

तर राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघणार  काँग्रेसेचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा आरोप 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

सरकारने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील सात जिल्हे दारिद्र रेषेखालील असल्याचे समोर आले आहे. यामध्ये यवतमाळ जिल्हा हा सर्वात मागास असल्याचे वास्तव समोर आले आहे. डेव्हलपमेंट करण्यासाठी असलेले वैधानिक विकास मंडळ हे गुंडाळून ठेवल्याने विकास खुटला आहे. सत्ताधा-यांनी विधानसभा निवडणूकीपुर्वी घोषणाबाजी केल्या असून, ती फसवणूक आहे. नुकताच सरकारने ४५ हजार कोटीचा अर्थसंकल्प घोषित केला आहे. दुसरीकडे ८ लाख कोटी रुपये कर्ज असून, राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघाल्या शिवाय राहणार नाही असा आरोप काँग्रेसेचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. 

यवतमाळ येथील विश्रामगृहात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, अमरावती विभागात सर्वात जास्त आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहे. सरकारने शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे आश्वातसन दिले होते. परंतू, कापूस, चना, तूर, सोयाबिन या पिकाला भाव देत नाही. जिल्ह्यात १ लाख क्विंटल सोयाबिल पडून आहे. शासनाने खरेदी करावी अशी मागणी केली आहे. जिल्ह्यात १६ चना खरेदी केंद्र असून, २५ हजार शेतक-यांकडे ४ लाख ५० हजार क्विंटल चना पडून आहे. मात्र अजुनही चना खेरदीचे आदेश दिले नाही. सरकारने शेतक-यांचे उत्पादन दुप्पट करु असे आश्वा.सन दिले होते. परंतू अजुन उत्पादनाला भाव मिळाला नाही हे दुदैव आहे असेही ठाकरे म्हणाले. शेतक-यांना शेतक-यांना वीज जोडणी दिली नाही. उलट त्यांना सौर उर्जवरील वीज घेण्याचा आग्रह करीत आहे. परंतू त्याला शेतक-यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सरकारने शेतक-याला वीज जोडणी देण्यात यावी. घरकुल योजना, वीज जोडणी, पाणी टंचाई यासह अनेक प्रश्नाावरुन त्यांनी सरकारवर टिका केली आहे. बिंदू नामावलीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांची भरती बंद आहे. जिल्ह्यातील शिक्षक भरती सुरु करावी अशी मागणीही करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला आमदार बाळासाहेब मांगुळकर, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, अशोक बोबडे, अनिल गायकवाड, संजय महल्ले उपस्थित होते. 

हे तर टक्केवारी सरकार  

सध्या राज्यासह जिल्ह्यात टक्केवारी दिल्या शिवाय कोणतेही काम होतांना दिसत नाही. अनेक विकास कामे मंजुर करतांना ३० टक्के मोजावे लागत असून हे टक्केवारी सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!