ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य शासनाने 328 नवीन दारु दुकानांना देण्यात येणारा परवाना रद्द करा.. दारूबंदी चळवळ प्रणेत्या… संगीता पवार 

 

 

 

यवतमाळ : 

राज्य शासनाने नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्वात समिती नियुक्त करुन राज्यात 328 नवीन दारु दुकानांना परवाना देण्याचे ठरविले आहेत. परंतू 1972 पासून नवीन दुकानांना परवानगी देण्यास बंदी असतांना राज्य सरकार घेत असलेल्या चुकीच्या पध्दतीने महसूल गोळा करण्याचा नवीन दारु दुकानांना परवानगी देणे हे समाज हिताचे नसल्याचे दारूबंदी व व्यसनमुक्ती चळवळीच्या प्रणेत्या संगीता पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले . राज्यात वाढत असलेली गुंडेगिरी अवैध धंदे वाहनाचे अपघात कौटूंबिक हिंसाचार या मध्ये अगोदरच कमालीची वाढ झालेली असतांना राज्य शासनाचा हा निर्णय चुकीचा आहेत हा निर्णय राज्य शासनाने परत घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन जनतेच्या माध्यमातून उभारण्यात येईल असा इशाराही संगीता पवार यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे राज्यपाल तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला महाराष्ट्र दारुबंदी, व्यसनमुक्ती प्रनेत्या संगीता पवार मानव अधिकार संघटनेच्या सरला इंगळे..रितू गटलेवार अभय व्यास दुर्गा पटले संगीता सरोदे गौतम राठोड उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!